न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारताने 345 धावा ठोकल्या आहेत. श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल, रविंद्र जाडेचा यांनी पहिल्या डावात केलेल्या शानदार खेळीच्या जोरावर हे शक्य झालं आहे.
न्यूझीलंडच्या पहिल्या डावाची सुरुवात झाली आहे. टॉम लॅथन आणि विल यंग मैदानात उतरले आहेत.टॉम लॅथन आणि विल्यम यंग यांनी 50 धावांची सलामीची भागिदारी केली आहे. टीम इंडियांच्या गोलंदाजांना विकेट मिळवण्यात यश आलेलं नाही.
भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाची करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताला पहिला धक्का मयंक अग्रवालच्या रूपात मिळाला. तो काईल जेमसनचा बळी ठरला. मयंकने २८ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीने १३ धावा केल्या.शुभमन गिलने ८१ चेंडूत पाच चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताने २७ षटकांनंतर एक विकेट गमावून ८० धावा केल्या होत्या. लंच ब्रेकपर्यंत ५२ धावांवर नाबाद राहिलेल्या शुभमन गिलने पहिल्याच षटकात आपली विकेट गमावली. काइल जेमिसनने दुसरी विकेट घेत त्याला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. त्याआधी डावाच्या आठव्या षटकात जेमिसनने १३ धावांवर मयंक अग्रवालकडे यष्टिरक्षकाकडे झेलबाद केले. भारताने ८२ धावांवर दुसरी विकेट गमावली.
दुसऱ्या सत्रात शुभमन गिलची विकेट गमावल्यानंतर भारताने शंभरी पार करताच चेतेश्वर पुजाराची विकेट गमावली. पुजाराने टीम साऊथीच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी २६ धावांचे योगदान दिले. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यर 105, शुभमन गिल 52, रवींद्र जाडेजा 50 आणि आर आश्विननं 38 धावा केल्या.