IND vs ENG T20I Series : कोरोनाला पराभूत करुन हीट मॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या इग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज साउथहॅम्प्टन मैदानावर पार पडणार आहे. कर्णधार म्हणून रोहित शर्माची ही पहिलीच परदेशातली मालिका असणार आहे. गेल्या वर्षाीच्या अखेरीस झालेल्या T20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने T20 फॉरमॅटचं कर्णधारपद सोडलं होतं. यानंतर बीसीसीआय वनडेचं कर्णधारपद सुद्धा काढलं असून, दोन्ही फॉरमॅटची जबाबदारी रोहितकडे सोपवली आहे.
रोहित शर्माने सर्व मालिकांमध्ये मिळवला दणदणीत विजय
विराट कोहलीनेही त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच २०२२ मध्ये कसोटीचं कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर बीसीसीआयने या फॉरमॅटची जबाबजदारीही रोहित शर्माकडे सोपवली. त्यामुळे आता रोहितला तिन्ही फॉरमॅटमध्ये पूर्णवेळ कर्णधारपद मिळालं आहे. अशाप्रकारे पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहित शर्माची विदेशातील ही पहिलीच मालिका आहे. त्यात रोहितला आता विजय मिळवत आपलं खातं उघडायचं आहे.
रोहित शर्माने पूर्णवेळ कर्णधार म्हणून फक्त 5 मालिका खेळल्या आहेत, विषेश म्हणजे त्या सर्व मॅच जिंकल्या आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेचा टी-20 मालिकेत क्लीन स्वीप केला. तर वनडेत वेस्ट इंडिज आणि कसोटीत श्रीलंकेचा क्लीन स्वीप झाला. आता हा क्लीन स्वीपचा विक्रम रोहित कायम ठेवतो की इंग्लंडचा संघ त्याचा विक्रम मोडतो हे पाहावं लागणार आहे.
पूर्णवेळ कर्णधार म्हणून रोहितने घरच्या मैदानावर सर्व मालिका खेळल्या अन् जिंकल्याही
T20I मालिकेत न्यूझीलंडला 3-0 ने क्लीन स्वीप (नोव्हेंबर 2021)
एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा ३-० असा क्लीन स्वीप (फेब्रुवारी २०२२)
T20I मालिकेत वेस्ट इंडिजला 3-0 ने क्लीन स्वीप (फेब्रुवारी 2022)
T20I मालिकेत श्रीलंकेला 3-0 ने क्लीन स्वीप (फेब्रुवारी 2022)
कसोटी मालिकेत श्रीलंकेचा 2-0 असा क्लीन स्वीप (मार्च 2022)