लोकशाही न्यूज नेटवर्क | इंग्लंड विरूद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात भारताने दुसऱ्या डावात १४९ धावांपर्यंत मजल मारली आहे. सध्या मैदानावर कर्णधार विराट कोहली (३५) आणि रविचंद्रन अश्विन (३०) धावा करून नाबाद आहेत. दरम्यान या खेळीमुळे भारताकडे ३५१ धावांची आघाडी आहे.
दुसऱ्या दिवशी अश्विनच्या फिरकीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. सलामीवीर बर्न्स (०), सिबली (१६), लॉरेन्स (९), कर्णधार रूट (६), मोईन अली(६), ओली स्टोन (१), जॅक लीच (५) आणि स्टुअर्ट ब्रॉड (०) सारे स्वस्तात माघारी परतले. बेन स्टोक्स (१८) आणि ओली पोप (२२) यांनी थोड्या धावा केल्या तर नवोदित बेन फोक्सने नाबाद ४२ धावांची झुंजार खेळी केली. त्यामुळे इंग्लंडला १३४ धावांपर्यंत मजल मारता आली.
इंग्लंडच्या फिरकीने तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांना हादरवून सोडलं. चेतेश्वर पुजारा (८), रोहीत शर्मा (२६), अजिंक्य रहाणे (१०), ऋषभ पंत (८) आणि अक्षर पटेल (७) यांची इंग्लंडच्या फिरकीपटूंचेनी शिकार केली. कर्णधार विराट कोहली (३५) आणि रविचंद्रन अश्विन (३०) यांनी सत्र संपेपर्यंत खेळपट्टीवर तग धरला आणि भारताला ६ बाद १४९ धावांपर्यंत मजल मारून दिली आहे.