भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी सामना शेवटच्या दिवशी रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी २७२ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचे ७ गडी तंबूत परतले आहेत, आणि भारत सध्या विजयापासून तिने विकेट दूर आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी लॉर्ड्सवर खेळली जात आहे. आज या कसोटीचा शेवटचा दिवस असून सामना रोमांचक स्थितीत आहे. लंचर्यंत भारताने आपला दुसरा डाव ८ बाद २९८ धावांवर घोषित केला आहे. इंग्लंडला विजयासाठी आता ६० षटकात २७२ धावांचे आव्हान आहे.दुसऱ्या डावात इंग्लंडची सुरुवात खराब झाली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सलामीवीर रोरी बर्न्सला पहिल्याच षटकात शून्यावर बाद केले. तर
बुमराहनंतर मोहम्मद शमीने इंग्लंडचा दुसरा सलामीवीर डॉमिनिक सिब्लेला शून्यावर माघारी धाडले. भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने हसीब हमीदला पायचित पकडत इंग्लंडला तिसरा धक्का दिला. हमीदला फक्त ९ धावांचे योगदान देता आले. जॉनी बेअरस्टोला इशांत शर्माने वैयक्तिक २ धावांवर पायचित पकडले. इंग्लंडचा कर्णधार जो रूट जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. रूटच्या बॅटती कड घेतलेला चेंडू स्लीपमध्ये असलेल्या विराट कोहलीच्या हाती विसावला. रूटने ५ चौकारांसह ३३ धावा केल्या. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने एकाच षटकात मोईन अली (१३) आणि त्यानंतर आलेल्या सॅम करनला (०) बाद केले.
इंग्लंडकडून ओली रॉबिन्सन आणि बटलर मैदानात आहे. इंग्लंडच्या ४० षटकात ७ बाद ९४ धावा केल्या आहेत. त्यांना अजून विजयासाठी २० षटकात १७८ धावांची गरज आहे. तर भारत विजयापासून ३ बळी दूर आहे.