India vs England 
क्रीडा

T20 World Cup 2024: सेमीफायनल सामन्यासाठी ICC ने बदलला नियम, भारतीय संघाला होणार फायदा

"पहिला सेमीफायनलचा सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगानिस्तान यांच्यात होणार आहे. तर दुसरा सेमीफायनलचा सामना इंग्लंड आणि भारत यांच्यात रंगणार आहे"

Published by : Naresh Shende

ICC New Rule For T20 World Cup 2024 Semi-Final : टी-२० वर्ल्डकप २०२४ मधील सुपर-८ सामने संपल्यानंतर आता सेमीफायनलचा महामुकाबला होणार आहे. पहिला सेमीफायनलचा सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगानिस्तान यांच्यात होणार आहे. तर दुसरा सेमीफायनलचा सामना इंग्लंड आणि भारत यांच्यात रंगणार आहे. आयसीसीने या दोन्ही सेमीफायनल सामन्यासाठी एका खास नियमात मोठा बदल केला आहे. या नियमामुळे टीम इंडियाला मोठा फायदा होऊ शकतो.

दोन्ही सेमीफायनलच्या सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. अफगानिस्तान-दक्षिण आफ्रिका सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. परंतु, भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या सामन्यासाठी राखीव दिवस नाही. भारत- इंग्लंड सामन्यासाठी आयसीसीने २५० मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला आहे. म्हणजेच ४ तास १० मिनिटांचा अतिरिक्त वेळ सामना पूर्ण करण्यासाठी दिला आहे. सामन्याची वेळ एकत्र केली तर एकूण ७ तास २० मिनिटांचा वेळ भारत-इंग्लंड सेमीफायनल सामन्यासाठी दिला आहे.

निकालासाठी कमीत कमी १० षटकांचा सामना होणं आवश्यक

आयसीसीने आणखी एका मोठ्या नियमात बदल केला आहे. दोन्ही सेमीफायनल सामन्यांच्या निकालासाठी कमीत कमी १० षटकांचा सामना होणे गरजेचं आहे. सुपर ८ आणि लीग चरणमध्ये ५-५ षटकांचा नियम होता. परंत, सेमीफायनलमध्ये यात वाढ करण्यात आली आहे. आता जर १०-१० षटकांचा सामना झाला नाही, तर सामना रद्द केला जाईल.

या नियमाचा फायदा टीम इंडियाला होऊ शकतो. भारत आणि इंग्लंड यांच्यात २७ जूनला गयानामध्ये दुसरा सेमीफायनलचा सामना खेळवण्यात येईल. पण त्या सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सतत पाऊस पडला तर भारत-इंग्लंड सामना रद्द केला जाईल आणि सामना न खेळताच भारताचा संघ फायनलमध्ये पोहोचेल. भारत-इंग्लंड सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस नाहीय. सतत पाऊस पडला तर, १०-१० षटकांचा खेळ करणं कठीण होईल. यामुळे भारतीय संघाला सामना रद्द होण्याचा फायदा होईल.

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय