क्रीडा

Icc Champions Trophy: पाकिस्तानात नाही, तर आता "या" ठिकाणी रंगणार भारताचे सामने

क्रिकेटप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. 2025 ला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्यात आलेली आहे. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही.

Published by : Team Lokshahi

क्रिकेटप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. 2025 ला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्यात आलेली आहे. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही. बीसीसीआयने भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचं म्हटल आहे. भारत पाकिस्तानमध्ये संबंध सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असताना, पाकिस्तानऐवजी दुबईमध्ये सामने खेळवण्याचा विचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

2023 मध्ये आशिया कपसाठी भारताचा पाकिस्तानात जाण्यास नकार होता त्यावेळी देखील भारतीय संघाचे सामने हे श्रीलंकेत खेळले गेले होते. तसेच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक हे 11 नोव्हेंबरला जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय संघाचे सगळे सामने हे लाहोरमध्येच आयोजित केले जातील अशी माहिती मिळाली आहे.

यावेळी स्पर्धेसाठी दोन गट तयार करण्यात येणार असून 'ग्रुप ए'मध्ये भारतासह पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांग्लादेशचा समावेश असणार आहे. तर 'ग्रुप बी'मध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या संघाचा समावेश असेल. या स्पर्धेसाठी लाहोर, कराची आणि रावळपिंडी ही तीन शहरे निवडण्यात आली आहेत.

नोमानींच्या व्हिडिओवर आशिष शेलारांची सडकून टीका, फडणवीसांनीही भरसभेत ऐकवली ऑडिओ क्लिप

Latest Marathi News Updates live: आदित्य ठाकरे यांचा मुंबई मेट्रोतून प्रवास

New Zealand Member Of Parliament: कोण आहे न्यूझीलंडची ती तरुण आक्रमक खासदार? जाणून घ्या...

औषधी गुणधर्म असणाऱ्या आवळ्यापासून घरच्याघरी बनवा चांगल्या प्रतीचा च्यवनप्राश

Nana Patole On Mahayuti:अजित पवारांसह महायुतीवर पटोलेंचा निशाणा, भ्रष्ट्राचारी व्यवस्था म्हणजे भाजप...