Gautam Gambhir Salary : टीम इंडियाला टी-२० वर्ल्डकपमध्ये चॅम्पियन बनवल्यानंतर राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला. त्यानंतर बीसीसीआयकडून गौतम गंभीरला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं. गंभीरला एक वर्ल्ड चॅम्पियन टीम मिळाली असून भारतीय नियामक मंडळाने गंभीरला तगडा पगार दिला जाणार आहे. श्रीलंके विरुद्ध होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यापासून टीम इंडियाचा नवीन प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरच्या करिअरची सुरुवात होईल.
रिपोर्ट्सनुसार,बीसीसीआयकडून गौतम गंभीरला रोहित शर्मा आणि विराट कोहलीपेक्षाही जास्त मानधन दिलं जातं. टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविडला वर्षाला १२ कोटी रुपये दिले जात होते. तसच गौतम गंभीरलाही वर्षाला १२ कोटी रुपये पगार दिला जाईल.
रोहित शर्माचा वार्षिक पगार
रोहित शर्मा बीसीसीआयच्या वार्षिक करारात A+ कॅटगरीत येतो. बीसीसीआयमध्ये या कॅटगरिच्या खेळाडूंना वर्षाला ७ कोटी रुपये दिले जातात.
किंग कोहलीचा वार्षिक पगार
रोहित शर्मा प्रमाणेच विराट कोहलीचाही बीसीसीआयच्या वार्षिक करारात A+ कॅटगरित समावेश आहे. बीसीसीआय कोहलीलाही वर्षाला ७ कोटी रपयांचं मानधन देते.
जसप्रीत बुमराहला वर्षाला किती रुपये मिळतात?
भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या लिस्टमध्ये सामील आहे. जसप्रीत बुमराहचाही बीसीसीआयच्या वार्षिक करारात A+ कॅटेगरित समावेश आहे. बीसीसीआयकडून बुमराहलाही वर्षाला ७ कोटी रुपये दिले जातात.