2022 च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी भारतीय संघाला दोन सराव सामने खेळायचे आहेत. आज टीम इंडिया पहिल्या सराव सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाशी झाला. या स्पर्धेत भारताने गोड सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज खेळण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 6 धावांनी विजय मिळवला. ब्रिस्बेनच्या गब्बा येथे खेळण्यात या सराव सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतानं केएल राहुल, सूर्यकुमारच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियासमोर 20 षटकात सात विकेट्स गमावून 187 धावांचं लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात 180 धावांपर्यंत मजल मारू शकला. या सामन्यात भारताने कसा आणि कोणामुळे विजय मिळवला याचे काही मुद्दे जाणून घ्या.
केएल राहुलची अर्धशतक
केएल राहुलने आज मैदानात येताच आक्रमक फलंदाजी सुरु केली. त्यामुळेच भारताने पावरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता 69 धावा केल्या. 6 ओव्हर्सनंतर रोहितने 9 चेंडूत केवळ 13 धावा केल्या होत्या. त्याचवेळी राहुलच्या 27 चेंडूत 50 धावा झाल्या होत्या.
सूर्यकुमारची दमदार फलंदाजी
केएल राहुल बाद झाल्यानंतर एकही फलंदाज खेळपट्टिवर टिकत नव्हता. त्यावेळी सूर्यकुमार यादवने शानदार फलंदाजी केली. त्याने डाव सावरला. लास्ट ओव्हरमध्ये त्याने अर्धशतक झळकावलं. त्याच्या फलंदाजीमुळे टीम 186 धावांपर्यंत पोहोचली. सूर्यकुमारने 33 चेंडूत 50 धावा केल्या. त्याने सहा चौकार आणि एक षटकार लगावला.
हर्षलची 19वी ओव्हर
शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 16 धावांची गरज होती. 19 वी ओव्हर हर्षल पटेलला देण्यात आली. त्याने या ओव्हरमध्ये एक विकेट घेऊन फक्त 5 रन्स दिल्या. ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर फिंचला बोल्ड करुन हर्षलने टीम इंडियाला मोठ यश मिळवून दिलं. फिंचने 79 धावा केल्या. त्याच्या पुढच्या चेंडूवर इंग्लिस रनआऊट झाला.
शमीची निर्णायक ओव्हर
मोहम्मद शमीला लास्ट ओव्हर मिळाली. त्याला 11 रन्स डिफेंड करायचे होते. शमीच्या पहिल्या दोन चेंडूवर 4 धावा निघाल्या. त्यानंतर शमीच रौद्ररुप पहायला मिळालं. कमिन्सने त्याच्या गोलंदाजीवर कोहलीकडे झेल दिला. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर कार्तिक आणि शमीने मिळून एगरला रनआऊट केलं. ओव्हरच्या दोन चेंडूंवर शमीने अचूक यॉर्कर टाकले. पहिल्या बॉलवर जॉश इंग्लिस आणि त्यानंतर रिचर्डसन बोल्ड झाला.
कोहलीची फिल्डिंग
विराट कोहलीने या मॅचमध्ये बॅटने विशेष कमाल केली नाही. पण जबरदस्त फिल्डिंग त्याने केली. कोहलीने 19 व्या ओव्हरमध्ये जॉश इंग्लिसला शानदार डायरेक्ट थ्रो वर रनआऊट केलं. त्यानंतर कमिन्सची लाँग ऑनला बाऊंड्री लाइनवर शानदार कॅच घेतली. कमिन्सने षटकाराच्या उद्देशाने हा फटका मारला होता.