आजपासून विश्वचषकाची सुरुवात करणार आहे. या विश्वचषकाचा पहिलाच सामना भारत विरुद्ध स्पेन होणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यंदा ही विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजित केली जात असल्याने याबाबत सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे. हा पहिला सामना राउरकेला येथील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सायकांळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
असे असतील दोन्ही संघ?
भारतीय संघ : अभिषेक, सुरेंदर कुमार, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, जर्मनप्रीत सिंग, मनदीप सिंग, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), ललित उपाध्याय, कृष्ण पाठक, निलम संजीप एक्सेस, पीआर श्रीजेश, नीलकांत शर्मा, शमशेर सिंग, वरुण कुमार, आकाशदीप सिंग, अमित रोहिदास (उपकर्णधार), विवेक सागर प्रसाद आणि सुखजीत सिंग.
स्पेनचा संघ: आंद्रियास रफी, अलेजांद्रो अलोन्सो, सीझर क्युरिएल, झेवी गिस्पर्ट, बोर्जा लॅकाले, अल्वारो इग्लेसियास, इग्नासियो रॉड्रिग्ज, एनरिक गोन्झालेझ, जेरार्ड क्लॅप्स, आंद्रियास रफी, जॉर्डी बोनास्ट्रे, जोकीन मेनिनी, मारियो मिरिल, मार्क रीलेस, मार्क रीलेस, मार्क रेन, सी. मार्क रेकासेन्स, पॉ क्युनिल आणि मार्क विझकैनो.