लवकरच पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा 2023 सुरू होणार आहे. तर पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा 13 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पुरुष हॉकी विश्वचषकाचे सामने भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियम आणि राउरकेला येथील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर होणार आहेत. तर या स्पर्धेत 16 संघ सहभागी आहेत. तर 16 संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे.
पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत 16 संघांमध्ये एकूण 44 सामने खेळवले जाणार आहेत. तर पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना हा 29 जानेवारीला खेळला जाणार आहे. या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताचा पहिला सामना हा 15 जानेवारीला इंग्लडसोबत होणार आहे.
पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा 2023 मधील भारतीय संघ पुढीलप्रमाणे :
हरमनप्रीत सिंग (कर्णधार), अमित रोहिदास (उपकर्णधार), पीआर श्रीजेश (गोलकीपर), कृष्णा पाठक (गोलकीपर), सुरेंद्र कुमार, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, नीलकांत शर्मा, शमशेर सिंग, विवेक सागर प्रसाद, नीलम संजीप एक्स, आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, राजकुमार पाल, जुगराज सिंग, ललितकुमार उपाध्याय, अभिषेक, सुखजित सिंग.