Hardik Pandya  
क्रीडा

हार्दिक पंड्याचा ICC रँकिंगमध्ये धमाका! भारताला चॅम्पियन बनवलच, पण स्वत:ही बनला नंबर 1 ऑलराऊंडर, इतर खेळाडूंनाही झाला फायदा

Published by : Naresh Shende

Hardik Pandya ICC Number 1 T20 All-Rounder : टी-२० वर्ल्डकप २०२४ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने बाजी मारली असून आयसीसीने आता साप्ताहिक रँकिंगबाबत मोठी अपडेट जाहीर केली आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या या रँकिंगमध्ये सर्वात जास्त उलथापालथ अष्टपैलू खेळाडूंमध्ये झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला जबरदस्त फायदा झाला आहे. पंड्या आता श्रीलंकाचा कर्णधार वानिन्दू हसरंगासोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. हार्दिक आणि हसरंगा या दोन्ही खेळाडूंना २२२ रेटिंग पॉईंट मिळाले आहेत.

हार्दिक पंड्यानं वानिन्दु हसरंगासोबत पहिल्या स्थानावर केली बरोबरी

टी-२० वर्ल्डकप २०२४ मध्ये भारताला चॅम्पियन बनवण्यासाठी हार्दिक पंड्यानं महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे पंड्याला ऑलराऊंडर रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे. त्याने पहिल्या स्थानावर असलेल्या वानिन्दू हसरंगाची बरोबरी केली आहे. हार्दिकने फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरोधात फलंदाजी करताना फक्त ५ धावाच केल्या. परंतु, पंड्याने गोलंदाजीत उल्लेखनीय कामगिरी केली. पंड्याने या सामन्यात २० धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या. त्याने शेवटच्या षटकात डेविड मिलरचा विकेट घेत संघाला विजय मिळवून दिला. हार्दिक पंड्याने संपूर्ण टी-२० वर्ल्डकपमध्ये ८ सामन्यांच्या ६ इनिंगमध्ये १५१.५७ च्या स्ट्राईक रेटने १४४ धावा केल्या. तर गोलंदाजीत ७.६४ च्या इकॉनमीनुसार ११ विकेट्स घेतल्या.

ऑलराऊंडर रँकिंगमध्ये टॉप-१० मध्ये झाले बदल

ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉयनिस, झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रजा आणि बांगलादेशचा शाकिब अल हसनलाही एक-एक स्थानाचा फायदा झाला आहे. हे तिनही खेळाडू अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. तर अफगानिस्तानचा मोहम्मद नबी चौथ्या स्थानावरून सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडचा लियाम लिविंगस्टोनही पिछाडीवर गेला आहे. तो आठव्या स्थानावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम आणि इंग्लंडचा मोईन अली नवव्या आणि दहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंना झाला फायदा

टी-२० च्या गोलंदाजीच्या रँकिंगमध्ये भारताचा अक्षर पटेल सहाव्या स्थानावरू सातव्या, कुलदीप यादव संयुक्तपणे आठव्या स्थानावर, जसप्रीत बुमराह १२ व्या, तर अर्शदीप सिंगनं १३ व्या क्रमांकावर उडी घेतली आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा एनरिक नॉर्खिया दुसऱ्या, तर तबरेज शम्सी १५ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर इंग्लंडचा आदिल रशीद अजूनही अव्वल स्थानी आहे.

पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

पर्यावरण रक्षण आणि हरित महाराष्ट्रासाठी वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत सन्मान सोहळा जाहीर

Aditi Rao Hydari Wedding Look: नववधू अदिती राव हैदरी सजली नवराईच्या पेहरावात, पाहा "हे" सुरेख फोटो...

Narendra Patil On Jarange Patil | नरेंद्र पाटलांचा मनोज जरांगे राजेश टोपेंवर हल्लाबोल | Marathi News

Sanjay Gaikwad On Rahul Gandhi | गायकवाडांकडून राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा | Marathi News