टीम इंडियाने (Team India ) इंग्लंडविरुद्ध सुरू असलेली टी-20 मालिका आधीच जिंकली आहे. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली असून रविवारी तिसरा सामना खेळला गेला. मात्र एजबॅस्टन येथील दुसऱ्या टी-२० सामन्याचा एक व्हिडिओ सोशल (Social Media) मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हार्दिक पांड्याबाबत (Hardik Pandyaएक मोठी बातमी समोर आली आहे.
दुसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाची फील्डिंग सुरू असताना, हार्दिक पांड्याने कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) शिवीगाळ केली. स्टंप माइकवरून हार्दिक पांड्याचा आवाज ऐकू येत होता, ज्यामध्ये त्याने रोहीत शर्माला अपशब्द वापरले.
हा व्हिडिओ ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत आहे आणि हार्दिक पांड्याबद्दल विविध ट्रेंड (#HardikAbusedRohit, #HardikPandya) चालवले जात आहेत. ज्यामध्ये ट्विटर युजर्सनी लिहिले आहे की, हार्दिक पांड्याने रोहित शर्माला (Rohit Sharma) शिवीगाळ केली आहे, तर हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) गर्विष्ठ असल्याचा आरोपही करत आहेत.
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विक्रांत गुप्ता यांनी सांगितले की, हार्दिकने रोहितला शिवीगाळ केली नसून, त्यावेळी डीआरएसबाबत चर्चा झाली होती. ज्यामध्ये हार्दिक म्हणत होता की, डीआरएसच्या वेळी माझे ऐका, कारण मी बॉलिंग करत आहे.