हरयाणा सरकारकडून नीरज चोप्राला ६ कोटींची घोषणा करण्यात आली आहे. याचसोबत क्लास वन अधिकारी पदावर त्याची नियुक्ती होणार असल्याची घोषणा हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केली आहे.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरलं आहे. टोक्यो ऑलिम्पिक भारतासाठी भाग्यवान ठरला आहे. तसेच यंदाच्या ऑलिम्पिकमधलं हे एकमेव सुवर्ण पदक आहे. भारताने आज ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रमही मोडला आहे. भारताने आतापर्यंत ७ पदके जिंकले आहेत.