Gujrat Titans Vs Sunrisers Hyderabad  
क्रीडा

IPL 2024: डावखुऱ्या फलंदाजांच्या आक्रमक खेळीमुळं गुजरातचा दमदार विजय, हैदराबादचा झाला पराभव

Published by : Naresh Shende

आयपीएल २०२४ च्या १२ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायजर्स हैदराबादचा ७ विकेट्सने पराभव करत या हंगामातील दुसऱ्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. हैदराबादने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ८ विकेट्स गमावून १६२ धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या गुजरातच्या संघानं १९.१ षटकात १६८ धावा केल्या आणि या सामन्यात विजयी पताका फडकवली. त्यानंतर गुजरात टायटन्सच्या मोहित शर्माला ३ विकेट्स घेतल्यामुळे प्लेयर ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला.

३४ धावांवर असताना सनरायजर्स हैदराबादला पाचव्या षटकात पहिला धक्का बसला. तसंच मयंक अग्रवाल १७ चेंडूत १६ धावा करुन स्वस्तात माघारी परतला. ट्रेविस हेडलाही धावांचा सूर गवसला नाही. हेड १९ धावा करुन तंबुत परतला. अभिषेक शर्माने राशिद खानच्या षटकात दोन षटकार मारले आणि संघाची धावसंख्या वाढवली. परंतु, १९ धावांवर असताना मोहित शर्माने अभिषेकला बाद केलं. त्यानंतर मैदानात उतरलेल्या मार्करम (१७), क्लासेन (२४), शहाबाझ अहमद (२२) आणि अब्दुल समद (२९) धावांवर बाद झाला.

हैदराबादने दिलेलं १६२ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी गुजरात टायटन्सच्या रिद्धीमान साहा आणि शुबमन गिलने सुरुवातीला आक्रमक फलंदाजी केली. परंतु, १३ चेंडूत २५ धावा करणारा साहा शाहाबाज अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर शुबमन गिलने २८ चेंडूत ३६ धावा केल्या. तसंच साई सुदर्शननेही ३६ चेंडूत ४५ धावा करून चमकदार कामगिरी केली. विशेष म्हणजे डेव्हिड मिलरने आक्रमक फलंदाजी करून २७ चेंडूत ४४ धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा