गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे. गुजरात टायटन्सने विजयासाठी १९३ धावाचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग राजस्थान रॉयल्सला 155 धावा करू शकला. त्यामुळे राजस्थानचा 37 धावांनी पराभव झाला.
सलामी फलंदाज जोस बटलर याने 24 चेंडूत 54 धावांची खेळी केली. देवदत्त पडिकलला एकही धाव काढता आली नाही. अश्विनला 8 धावा काढता आल्या. कर्णधार संजू सॅमसन 11 धावांवर धावबाद झाला. हेटमायर 29 धावा काढून बाद झाला.नीशम 17 धावांवर बाद झाला.
नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गुजरातची सुरूवात चांगली झाली नाही. मॅथ्यू वेड अवघ्या १२ धावांवर असताना व्हॅन डर ड्यूसेनच्या डायरेक्ट हीटवर धावबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेला विजय शंकरदेखील अवघ्या दोन धावांवर कुलदीप सेनने टाकलेल्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर मात्र तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या कर्णधार हार्दिक पांड्याने धडाकेबाज खेळी केली. त्याने चार षटकार आणि आठ चौकार लगावत नाबाद ८७ धावा केल्या. दरम्यान, अभिनव मनोहर आण डेविड मिलरने हार्दिक पांड्याला साथ दिली. अभिनवने २८ चेंडूंमध्ये ४३ धावा केल्या. तर डेविड मिलरने १४ चेंडूंमध्ये एक षटकार आणि पाच चौकार लगावत नाबाद ३१ धावा केल्या. वीस षटकांत गुजरातने १९२ धावा केल्या होत्या.