क्रीडा

Gujrat Titans Captain: गुजरात टायटन्सने केली नवीन कर्णधाराची घोषणा

IPL 2024 पूर्वी हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये गेल्यानंतर गुजरात टायटन्सने मोठे पाऊल उचलले आहे. गुजरात टायटन्सने स्टार फलंदाज शुभमन गिलला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.

Published by : Team Lokshahi

इंडियन प्रीमियर लीग (IPL) साठी एक मोठी बातमी समोर आली आहे. गुजरात टायटन्सने आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिल आता आयपीएलच्या आगामी मोसमात गुजरात टायटन्सचे नेतृत्व करणार आहे. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये गेल्यानंतर गुजरात टायटन्सने हा मोठा निर्णय घेतला आहे.

गुजरात टायटन्सचे क्रिकेट संचालक विक्रम सोलंकी म्हणाले, 'शुबमन गिलने गेल्या दोन वर्षांत खेळाच्या सर्वोच्च स्तरावर लक्षणीय प्रगती केली आहे. आम्ही त्याला केवळ फलंदाज म्हणूनच नव्हे तर क्रिकेटमध्ये एक नेता म्हणूनही परिपक्व पाहिले आहे. मैदानावरील त्याच्या योगदानामुळे गुजरात टायटन्सला एक मजबूत शक्ती म्हणून उदयास येण्यास मदत झाली आहे. त्याची परिपक्वता आणि कौशल्य त्याच्या मैदानावरील कामगिरीमध्ये स्पष्टपणे दिसून येते. त्याला कर्णधार बनवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

शुभमन गिल आयपीएल 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता आणि त्याने ऑरेंज कॅप जिंकली. गिलने 17 सामन्यात 59.33 च्या सरासरीने 890 धावा केल्या होत्या. केन विल्यमसनही गुजरात टायटन्सचा कर्णधार होण्याच्या शर्यतीत होता, पण भविष्य डोळ्यासमोर ठेवून फ्रँचायझीने या युवा भारतीय खेळाडूला महत्त्व दिले आहे.

24 वर्षीय शुभमन गिलने 2018 साली कोलकाता नाइट रायडर्सकडून (KKR) आयपीएलमध्ये पदार्पण केले. गिलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत 91 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 37.70 च्या सरासरीने 2790 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 3 शतके आणि 18 अर्धशतके झळकावली. त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या १२९ धावा आहे. शुभमन गिलने त्याच्या आयपीएल करिअरमध्ये 273 चौकार आणि 80 षटकार मारले आहेत. IPL 2023 च्या लिलावापूर्वी गिलला गुजरात टायटन्सने 8 कोटी रुपयांना करारबद्ध केले होते.

कर्णधार होण्याबाबत शुभमन गिल म्हणाला, 'गुजरात टायटन्सचे कर्णधारपद स्वीकारताना मला आनंद होत आहे. एवढ्या चांगल्या संघाचे नेतृत्व करणे ही मोठी गोष्ट आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी फ्रँचायझीचे आभार मानतो. आमच्याकडे दोन आश्चर्यकारक हंगाम आले आहेत. गुजरात टायटन्सने 2022 आणि 2023 हंगामात भाग घेतला होता. त्याच्या पदार्पणाच्या मोसमातच त्याने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले. गेल्या मोसमात ती उपविजेती ठरली होती.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news