भारत इंग्लंडमध्ये आज चौथा टी-20 सामना खेळवला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार असून कोण नाणेफेक जिंकत याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. कारण नाणेफेक जिंकणारा संघच सामना जिंकत आहे. दरम्यान पाच ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेतील इंग्लंड 2-1 ने आघाडीवर आहे.
मधली फळी अधिक सक्षम करण्यासाठी हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदरच्या साथीला राहुल तेवतिया किंवा अक्षर पटेल यांच्यापैकी एका अष्टपैलू खेळाडूला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच फिरकी गोलंदाज यजुर्वेंद्र चहल दोन्ही पराभूत सामन्यांत महागडा ठरला. हार्दिक पंड्या गोलंदाजीत अपेक्षित प्रभाव पाडू शकलेला नाही. भुवनेश्वर कुमारलाही पुनरागमन झोकात साजरे करता आलेले नाही.
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, राहुल तेवतिया, यजुर्वेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, थंगरासू नटराजन.
इंग्लंड संघ : ईऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, लिआम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम बिलिंग्स, आदिल रशीद, रीस टॉप्ली, ख्रिस जॉर्डन, सॅम करन, टॉम करन, मार्क वूड, जोफ्रा आर्चर.