कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन या वरिष्ठ स्टार खेळाडूंना 5 सप्टेंबरपासून बेंगळुरू येथे सुरू होणाऱ्या दुलीप ट्रॉफीमध्ये खेळण्यापासून सूट देण्यात आली आहे. राष्ट्रीय निवडकर्त्यांनी स्पर्धेसाठी 4 संघांची नावे देऊन देशांतर्गत खेळाडू आणि संभाव्य प्रतिभा यांच्यात चांगला समतोल साधला आहे. त्याचबरोबर ईशान किशननेही देशांतर्गत स्पर्धेत पुनरागमन केले आहे. तो यष्टिरक्षक म्हणून खेळताना दिसणार आहे. आयपीईएलला प्राधान्य दिल्याने आणि रणजी ट्रॉफी स्पर्धेत न खेळल्यामुळे ईशानला बीसीसीआयच्या केंद्रीय कराराच्या यादीतून वगळण्यात आले होते.
शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, अष्टपैलू रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यासारखे आंतरराष्ट्रीय स्टार या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी खेळणारा T20 कर्णधार सूर्यकुमार यादव याचीही निवड करण्यात आली आहे. सूर्यकुमार व्यतिरिक्त इतरांनी संघात आपले स्थान पक्के केले आहे. भारताच्या T20 विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेला यष्टीरक्षक ऋषभ पंतही या स्पर्धेत खेळणार आहे. 2022 मध्ये कार अपघातातून परतल्यानंतर ही त्याची पहिली रेड-बॉल स्पर्धा असेल.
भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांच्याशिवाय यष्टीरक्षक आर्यन जुयाल आणि अभिषेक पोरेल यांचाही संघात समावेश असेल. भारतीय खेळाडूंना फक्त एकच सामना खेळायचा होता, त्यामुळे कोहली, रोहित, बुमराह आणि अश्विन यांना सूट देण्यात आली होती.
स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी 4 संघ पुढीलप्रमाणे आहेत
संघ A : शुभमन गिल (कर्णधार), मयंक अग्रवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), टिळक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, कुलदीप यादव, आकाश दीप, प्रसीद कृष्णा, खलील अहमद, आवेश खान , विद्वथ कवेरप्पा, कुमार कुशाग्र, शाश्वत रावत.
संघ B : अभिमन्यू इसवरन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी, एन जगदीसन (यष्टीरक्षक).
संघ C : रुतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, बी इंद्रजीत, हृतिक शौकीन, मानव सुथार, उमरान मलिक, विशाक विजयकुमार, अंशुल खंबोज, हिमांशू चौहान, अरमान मार्कन, अरमान चौहान. (विकेटकीपर), संदीप वॉरियर.
संघ D : श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, इशान किशन (यष्टीरक्षक), रिकी भुई, सरांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भगत (विकेटकीपर), सौरभ कुमार.