क्रीडा

IPL Auction 2024: पहिल्यांदाच 'या' ठिकाणी होणार आयपीएलचा लिलाव

Indian Premier League 2024: आयपीएल 2024 लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये होणार आहे. प्रथमच देशाबाहेर खेळाडूंसाठी बोली लावली जाणार आहे. संघाच्या पर्ससह खेळाडूंना कायम ठेवण्याची आणि सोडण्याची मुदतही वाढवण्यात आली आहे.

Published by : Team Lokshahi

IPL Auction 2024 In Dubai: भारतात चालू असलेल्या विश्वचषक 2023 दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील आवृत्तीच्या लिलावासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. या वर्षी प्रथमच आयपीएलचा लिलाव देशाबाहेर म्हणजेच दुबईत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

डिसेंबरमध्ये मोठ्या संख्येने विवाहसोहळा असल्याने हॉटेल्स उपलब्ध नसल्यामुळे, यावेळी दुबईमध्ये आयपीएल 2024 लिलाव आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व 10 IPL संघांसाठी पर्स (खेळाडूंची बोली लावण्याची रक्कम) मागील लिलावात उपलब्ध असलेल्या 95 कोटी रुपयांवरून 100 कोटी रुपये करण्यात आली आहे.

कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक?

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) - 31.4 cr

गुजरात टायटन्स (GT) - 23.15 cr

मुंबई इंडियन्स (MI) - 15.25 cr

लखनऊ सुपर जायंट्स (LSG) - 13.15 cr

राजस्थान रॉयल्स (RR) - 14.5 cr

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) - 40.75 cr

कोलकाता नाइट रायडर्स (KKR) - 32.7 cr

पंजाब किंग्ज (PBKS) - 29.1 cr

दिल्ली कॅपिटल्स (DC) - 28.95 cr

सनरायझर्स हैदराबाद (SRH) - 34 cr

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी