भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. मात्र, या दौऱ्यात भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ बांगलादेशसोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना चट्टोग्रामच्या झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवला गेला. याच पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस संपला. भारतीय संघानं पहिल्या दिवसाखेर 6 विकेट्सच्या मोबदल्यात 278 धावा केल्या. तर, श्रेयस अय्यर नाबाद 82 धावांसह क्रिजवर उभा आहे.
भारतने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र मैदानात आलेला भारतीय संघ खराब कामगिरी करताना दिसून आली. कर्णधार केएल राहुल (22 धावा) आणि शुभमन गिल (20 धावा) स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर विराट कोहलीही अवघ्या एका धावेवर बाद झाला. मात्र, यानंतर चेतेश्वर पुजाराने डाव सावरला. त्याला ऋषभ पंतचीही चांगली साथ मिळाली. 32 षटकात ऋषभ पंतच्या रुपात भारताला चौथा धक्का लागला. तो 46 धावा करून बाद झाला. त्यानतंर चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यरनं संघाची धावसंख्या पुढं नेली. चेतेश्वर पुजारानं 90 धावांची उत्कृष्ट खेळी केली. दरम्यान, पहिल्या दिवशीच्या अखेरच्या चेंडूवर मेहंदी हसननं अक्षर पटेलला बाद केलं. श्रेयस अय्यर नाबाद 82 धावांसह क्रिजवर उभा आहे. पहिल्या दिवसाखेर भारतानं 6 विकेट्सच्या मोबदल्यात धाव फलकावर 278 धावा लावल्या आहेत.