क्रीडा

Neeraj Chopra: वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारा पहिलाच भारतीय

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने इतिहास रचत जे कुणा भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलंय. नीरजने वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये भालाफेकीत सुवर्ण पदक मिळवलंय.

Published by : Team Lokshahi

भारतीय गोल्डन बॉय नीरज चोप्राने वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम फेरीत इतिहास रचला आहे. वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. भारताचा स्टार खेळाडू नीरजने हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथील नॅशनल अ‍ॅथलेटिक्स सेंटरमध्ये 88.17 मीटर भाला फेकून सुवर्णपदकावर कब्जा केला. अंतिम फेरीत एकूण सहा प्रयत्न झाले असून नीरजने दुसऱ्या फेरीपासून गुंणतालिकेत आघाडी कायम ठेवली होती.

हंगरीची राजधानी बुडापेस्ट वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये भारताचा ‘गोल्डन बॉय’ अशी ओळख असलेल्या भालाफेकपटू नीरज चोप्रा याने भारताच्या शिरपेचात मानाच तुरा खोवला आहे. नीरज चोप्रा याने वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप फायनल 2023 मध्ये पाकिस्तानच्या अशरफ नदीम याचा खुर्दा उडवला. नीरज गोल्डन मेडल जिंकेल, असा विश्वास साऱ्या देशाला होता. नीरजने भारतीयांच्या विश्वास खरा ठरवला आणि पुन्हा एकदा त्याने स्वत:ला गोल्डन बॉय असं का म्हणतात हे सिद्ध करुन दाखवलं.नीरजने गोल्ड मेडल जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

नीरज वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा पहिलाच भारतीय ठरला आहे. नीरजने दुसऱ्याच प्रयत्नात 88.17 मीटर लांब भाला फेकला आणि अव्वल स्थान पटकावलं. नीरज यासह एकाच वेळी ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये गोल्ड जिंकणारा जगातील दुसराच भालाफेकपटू ठरला. तसेच पाकिस्तानच्या अशरफ नदीम याने दुसरा क्रमांक पटकावत सिल्वहर मेडलची कमाई केली.

नीरजने 2016 मध्ये ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली होती नीरज तेव्हा अ‍ॅथलेटिक्समध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय ठरला होता. आता 7 वर्षांनी नीरजने इतिहासाची पुनरावृत्ती करत सिनिअर लेवलला वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result