आशिया चषकमध्ये भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना पार पडणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. मात्र, सामन्यापूर्वी दुबई स्टेडियममध्ये आग लागल्याची माहिती मिळाली आहे. एका वृत्तवाहिनेने या संबंधी वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
दरम्यान सध्या आग आटोक्यात आणण्यात आली असली तरी त्यामुळे सामन्याचा नाणेफेक लांबण्याची शक्यता आहे.भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ आशिया कपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी हा स्पर्धेतील शेवटचा सामना असेल. दोन्ही संघ विजयासह आशिया चषक 2022 स्पर्धेला निरोप देणार आहेत.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, दीपक चहर.
अफगाणिस्तान संघ
हजरतुल्ला झाझाई, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीप), इब्राहिम जार्दन, नजीबुल्ला जद्रान, करीम जनात, मोहम्मद नबी (क), रशीद खान, अजमातुल्ला ओमरझाई, फरीद अहमद, मुजीबुर रहमान, फजलहक फारुकी.