कतार येथे झालेल्या विश्वचषक फायनलमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव केला. तब्बल ३६ वर्षांनंतर त्याला विश्वचषक जिंकता आला आहे. 1978 आणि 1986 नंतर त्याने आता तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. निर्धारित ९० मिनिटे सामना २-२ असा बरोबरीत राहिल्याने सामना अतिरिक्त वेळेत गेला. तिथे लिओनेल मेस्सीने गोल करून अर्जेंटिनाला ३-२ ने आघाडीवर नेले, पण कायलियन एमबाप्पेच्या मनात काही वेगळेच होते. त्याने 117व्या मिनिटाला गोल करून सामना 3-3 असा बरोबरीत आणला. यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने सामना जिंकला.
फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ मानला जातो. विश्वचषक ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला विजेतेपदासह कोट्यवधी रुपयांची प्राईज मनीही मिळते. फिफा विश्वचषकाची केवळ विजेता संघच नाही तर उपविजेता संघालाही बक्षिसे मिळतात. विश्वचषकादरम्यान फिफाकडून एकूण 3641 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही रक्कम सहभागी संघांना बक्षीस म्हणून दिली जाणार आहे.
विश्वचषक स्पर्धेत सहभागी प्रत्येक संघाला 9-9 मिलियन डॉलर
प्री-क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलेल्या संघांसाठी 13 मिलियन डॉलर्सची बक्षीस रक्कम
क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झालेल्या संघांसाठी 17 मिलियन डॉलर्स बक्षीस रक्कम
कोणत्या संघाला किती प्राईज मनी?
विजेती अर्जेंटीना : 347 कोटी रुपये
उपविजेता फ्रांस : 248 कोटी रुपये
तिसऱ्या क्रमांकावरील टीम : 223 कोटी रुपये (क्रोएशिया)
चौथ्या क्रमांकावरील टीम : 206 कोटी रुपये (मोरक्को)