इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने सर्व क्रिकेटपासून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मानसिक आरोग्यास प्राधान्य देण्यासाठी त्याने हा ब्रेक घेतला आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली आहे. क्रिकेट जगतातली हि सर्वात मोठी बातमी आहे.
स्टोक्सने त्याच्या मानसिक आरोग्यास प्राधान्य देण्यासाठी आणि डाव्या हाताच्या बोटाला विश्रांती देण्यासाठी पुढील आठवड्यात भारताविरुद्ध होणाऱ्या पूर्वी इंग्लंडच्या कसोटी संघातून माघार घेतली आहे.इंग्लंड क्रिकेट बोर्ड बेन स्टोक्सच्या या निर्णयाला पूर्णपणे पाठिंबा देत आहे, तसंच त्याला हवी ती मदत केली जाईल, असं बोर्डाने सांगितलं आहे. बेन स्टोक्स भारताविरुद्धच्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी उपलब्ध नसेल. त्याच्याऐवजी समरसेटच्या क्रेग ओव्हरटनला संधी देण्यात आली आहे.
दरम्यान पाकिस्तानविरुद्धच्या 3 वनडे मॅचच्या सीरिजमध्ये स्टोक्स इंग्लंडला कर्णधार होता. या सीरिजसाठीही स्टोक्सला विश्रांती देण्यात आली होती, पण इंग्लंडच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे मॅचच्या काही तास आधी टीममध्ये बदल करण्यात आला आणि स्टोक्सने टीममध्ये पुनरागमन करत नेतृत्व स्वीकारलं. या सीरिजमध्ये इंग्लंडचा 3-0 ने विजय झाला.