भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना हेडिंग्ले, लीड्स येथे खेळला जात आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर भारत २ बाद २१५ धावा केल्या आहेत. भारत अजूनही १३९ धावांनी पिछाडीवर आहे.
इंग्लंडचा पहिला डाव ४३२ धावांवर आटोपला. त्यानंतर तिसऱ्या दिवसअखेर भारताने आपल्या दुसऱ्या डावात झुंंजार वृत्तीचे दर्शन घडवत ८० षटकात २ बाद २१५ धावा केल्या आहेत. भारत अजूनही १३९ धावांनी पिछाडीवर आहे. केएल राहुल स्वस्तात बाद झाल्यानंतर रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी भारताची पिछाडी कमी केली. तिसऱ्या दिवसअखेर पुजारा १५ चौकारांसह ९१ तर विराट ६ चौकारांसह ४५ धावांवर नाबाद होते. उद्या म्हणजे चौथ्या दिवशी नेमक काय होत याकडे क्रीडा विश्वाचे लक्ष लागले आहे.