Ekta Bisht 
क्रीडा

Ekta Bisht: भारतीय फिरकीपटू एकता बिश्तने रचला इतिहास, ८ धावांत ७ बळी!

भारतीय महिला क्रिकेटपटू एकता बिष्टने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Published by : shweta walge

भारतीय महिला क्रिकेटपटू एकता बिष्टने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सीनियर टी-२० चॅम्पियनशिपमध्ये तीने अप्रतिम कामगिरी केली आहे. उत्तराखंडकडून खेळताना एकताने झारखंडविरुद्ध केवळ आठ धावा देत चार षटकांत सात बळी घेतले. त्यात हॅट्ट्रिकचाही समावेश आहे. यासोबतच एकताने एक विक्रमही आपल्या नावावर केला आहे. महिला वरिष्ठ T20 चॅम्पियनशिपमध्ये एकाही गोलंदाजाने इतक्या कमी धावा देऊन इतक्या विकेट्स घेतल्या नाहीत.

एकताच्या शानदार गोलंदाजीमुळे उत्तराखंडने झारखंडचा १० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना उत्तराखंडने 20 षटकांत 6 गडी गमावून 107 धावा केल्या. प्रत्युत्तरात झारखंडचा संघ 97 धावांत गारद झाला. एकताला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. एकताने 19व्या षटकात हॅट्ट्रिक करताना देवयानी, पूनम राऊत आणि प्राजक्ता यांना सलग तीन चेंडूंवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 19व्या षटकात त्याच्या खात्यात एकूण चार विकेट्स आल्या.

एकता सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. तीने भारतासाठी 63 एकदिवसीय, 42 टी-20 आणि एक कसोटी खेळले आहे. एकताने वनडेमध्ये 98, टी-20मध्ये 53 आणि कसोटीत तीन विकेट घेतल्या आहेत. एकता 2017 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या मिताली राजच्या संघाचा भाग होती.

मतदानाच्या दिवशी पुणे महानगरपालिकेला सुट्टी

अभिनेता शाहरुख खान धमकीप्रकरणी आरोपीला 18 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

“कोमट" पाण्यातील गॅरंटीच्या "चकल्या"!! आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

'राज ठाकरे कदाचित झोपेतून उठले नसतील' सुषमा अंधारे अस का म्हणाल्या?

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षातील गौप्यस्फोट आम्ही केलं तर त्यांना पक्ष बंद करावा लागेल