नवी दिल्ली : बीसीसीआयने 2022 या वर्षासाठी भारताच्या तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये ऋषभ पंतचे नावही एका श्रेणीत समाविष्ट आहे. 2022 मध्ये बीसीसीआयने जारी केलेल्या कसोटी क्रिकेटमध्ये ऋषभ पंत फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह हे अव्वल कामगिरी ठरले होते. तर श्रेयस अय्यर एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणि मोहम्मद सिराज गोलंदाजीमध्ये अव्वल कामगिरी करणारे होते.
तर टी-20 क्रिकेटमध्ये बीसीसीआयने सूर्यकुमारला सर्वोच्च स्थान दिले आहे. गोलंदाजीत यादव आणि भुवनेश्वर कुमार यांची निवड करण्यात आहे. विशेष म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्माची यांची नावे तिन्ही फॉरमॅटमध्ये समाविष्ट नाहीत.
कसोटी क्रिकेट
1. ऋषभ पंत
सामना -7
रन- 680
2. जसप्रीत बुमराह
सामना - 5
विकेट - 22
2 वेळा पाच बळी
वनडे क्रिकेट
1. श्रेयस अय्यर
सामना - 17
रन- 724
2. मोहम्मद सिराज
सामना - 15
विकेट -24
टी-20 क्रिकेट
1. सूर्यकुमार यादव
सामना -31
धावा - 1164
2. भुवनेश्वर कुमार
सामना -32
विकेट - 37