दिल्लीने कोलक्ततावर 44 धावांनी मात दिली आहे.केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर 54 धावाची एकाकी झुंज देऊन सुद्धा इतक खेळाडूंना विजय खेचून आणता आला नाही. 171 धावात संपुर्ण कोलकत्ता संघ गारद झाला.
दिल्लीने (Delhi capitals) दिलेल्या 216 धावांचे लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या कोलक्तताची सुरूवात चांगली झाली होती. केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर 54 धावा करुन बाद झाला आहे. कुलदीप यादवने त्याला बाद केलं आहे.नितीश राणा 30, आंद्रे रसेल 24 धावा केल्या याव्यतिरीक्त इतर खेळाडू जास्त धावा करू शकले नाही. आणि कोलकत्ता संघ 171 धावात संपुष्ठात आला.
दिल्लीविरुद्ध (Delhi capitals) सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकात्याच्या (Kolkata Knight Riders) संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीकडून (Delhi capitals) पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वार्नर सलामीसाठी उतरले होते. 51 धावा करुन पृथ्वी शॉ बाद झाला आहे. वरुण चक्रवर्थीने त्याला त्रिफळाचीत केलं आहे.कर्णधार ऋषभ पंत 27 धावा करुन रसेलच्या चेंडूवर झेलबाद झाला. ज्यानंतर केवळ एक धाव करुन ललित यादवही नारायणच्या चेंडूवर पायचीत झाला.रोवमेन पोवेलला 8 धावांवर बाद केलं आहे. डेव्हिड वॉर्नरने एका बाजूने संघाची फलंदाजी सांभाळली होती. पण 61 धावा करुन तोही बाद झाला आहे. उमेश यादवने त्याची विकेट घेतली आहे. या सर्व फलंदाजांच्या बळावर दिल्लीने 215 धावांचा डोंगर उभारला होता.