India Vs Bangladesh Test Series Team Lokshahi
क्रीडा

उद्या होणार भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये निर्णायक कसोटी सामन्याला सुरुवात; पाहा कधी, कुठं असेल सामना

कसोटी मालिकेत भारतीय संघ 1-0 पुढे. त्यामुळे आता उद्या होणारा दुसरा कसोटी सामना महत्वाचा असणार आहे.

Published by : Sagar Pradhan

भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. मात्र, या दौऱ्यात भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ बांगलादेशसोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका सध्या खेळली जात आहे. कसोटी मालिकेत भारतीय संघ 1-0 पुढे. त्यामुळे आता उद्या होणारा दुसरा कसोटी सामना महत्वाचा असणार आहे. भारतासाठी उद्याचा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना कधी, कुठं खेळला जाणार आहे? हे जाणून घ्या.

कधी, कुठं असेल सामना?

दुसरा कसोटी सामना बुधवारी 22 डिसेंबर ते 26 डिसेंबरपर्यंत खेळला जाईल.भारतीय संघ अणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार, सकाळी 9.00 वा सामन्याला सुरूवात होईल. अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. हा सामना शेर-ए-बांग्ला नॅशनल स्टेडियम ढाका येथे खेळवला जाईल.

कुठे पाहता येईल सामना?

या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच सोनी लिव (Sony Liv) अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येईल.

असा असेल भारताचा कसोटी संघ

केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, अभिमन्यू, नवदीप सैनी, सौरभ कुमार, जयदेव उनादकट.

असा असेल बांगलादेशचा कसोटी संघ

शकीब अल हसन (कर्णधार), महमुदुल्लाह, लिटन दास, खालिद अहमद, नजमुल हुसेन शांतो, नुरुल हसन, इबत हुसेन, मोमिनुल हक, मेहंदी हसन मिर्झा, शरीफुल इस्लाम, यासिर अली, तैजुल इस्लाम, झाकीर हसन, मुशफिकर रहिम , तस्किन अहमद, रेहमान रझा, अनामूल हक.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का