rashid khan : आयपीएल 2022 च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जने दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज फाफ डू प्लेसिसचा संघात समावेश केला नाही. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) फाफ डू प्लेसिसला विकत घेत त्याच्याकडे संघाचे कर्णधारपद सोपवले. फाफ डू प्लेसिसनेही उत्तम कर्णधारपद सांभाळत आपल्या संघाला प्लेऑफमध्ये नेले. पण, आता पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जने फाफ डू प्लेसिसला सोबत घेतले आहे. (csa t20 league faf du plessis chennai super kings rashid khan mumbai indians)
खरे तर पुढील वर्षीपासून क्रिकेट दक्षिण आफ्रिका टी-२० लीग सुरू होत आहे. या लीगमधील सर्व 6 संघ फक्त IPL संघांच्या मालकीचे आहेत. आता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) व्यवस्थापनाने CSA T20 लीगसाठी Faf du Plessis सोबत करार केला आहे. चेन्नई सुपर किंग्ज व्यवस्थापनाने डु प्लेसिसला आपला मार्की खेळाडू बनवले आहे.
मुंबई इंडियन्सने CSA T20 लीगमध्ये राशिद खानचा आपल्या संघात समावेश केला आहे. रशीद खान व्यतिरिक्त मुंबईने लियाम लिव्हिंगस्टन, कागिसो रबाडा आणि सॅम कुरान यांचाही आपल्या संघात समावेश केला आहे.
चेन्नई आणि मुंबई व्यतिरिक्त, दिल्ली कॅपिटल्सने (DC) एनरिक नोरखियाला त्यांचा मार्की खेळाडू म्हणून नाव दिले आहे. सनरायझर्स हैदराबादने (SRH) एडन मार्करामला त्यांचा मार्की खेळाडू म्हणून नियुक्त केले आहे. राजस्थान रॉयल्स (RR) ने जोस बटलरची निवड केली आहे आणि लखनौ सुपरजायंट्स (LSG) ने डी कॉकला त्यांचे मार्की खेळाडू म्हणून निवडले आहे.
CSA T20 लीगमध्ये, प्रत्येक संघ जास्तीत जास्त पाच खेळाडू निवडू शकतो. आता लिलावात इतर खेळाडूंना खरेदी केले जाईल. प्रत्येक संघाला 10 दक्षिण आफ्रिकेचे आणि 7 परदेशी खेळाडूंची निवड करावी लागेल. प्लेइंग इलेव्हनमध्ये 7 दक्षिण आफ्रिकेचे आणि 4 विदेशी खेळाडू असतील.