भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ईशान किशन आणि श्रेयस अय्यरला वार्षिक करारातून बाहेर केलं . त्यामुळे भारतीय संघातील त्यांच्या स्थानाबद्दल अनेक प्रकारच्या अटकळ बांधण्यात येत आहेत. अशातच आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने ईशान किशन आणि श्रेयस अय्यरच्या पुनरागमनाबाबत मोठी प्रतिक्रिया दिलीय. "घरेलू क्रिकेट खेळणाऱ्यांसाठी रस्ता खुला आहे. फिट होऊन पुनरागमन करण्यासाठी निवड समितीला खेळाडूंनी मजबूर करावं, हेच महत्वाचं आहे, असं राहुल द्रविडनं म्हटलं आहे.
धरमशालेत कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर द्रविडने पत्रकार परिषदेत म्हटलं, "मी कॉन्ट्रॅक्ट ठरवत नाही. कॉन्ट्रॅक्ट निवड समिती आणि बोर्डाकडून निश्चित केला जातो. मला हेही माहित नाही की, मानदंड काय आहे. मी यामध्ये सहभागी आहे. शेवटच्या १५ खेळाडूंबाबत लोक माझं मत विचारतात, मी आणि रोहित प्लेईंग ईलेव्हनची निवड करतो. हे काम अशाच प्रकारे सुरु असतं.आम्ही कधीच यावर चर्चा केली नाही की, कुणाकडे कॉन्टॅ्क्ट आहे की नाही. त्या खेळाडूला १५ मध्ये घेतलं जाईल की नाही. असे अनेक उदाहरण आहेत. कधी कधी आम्हाला माहितही नसतं की, कॉन्ट्रॅक्टच्या सूचीत कोणत्या खेळाडूंन सामील केलं आहे, जेव्हा आम्ही निर्णय घेतो तेव्हा १५ किंवा अंतिम ११ वर चर्चा होते."
दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतू बाहेर पडल्यावर ईशान क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिला. परंतु, ईशान मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यासोबत बडौदाच्या मैदानात आयपीएलचा सराव करत असल्याचं समोर आलंय. भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बीसीसीआयने ईशानला घरेलू क्रिकेट खेळण्यासाठी सांगितलं होतं. तरीही ईशानने रणजी क्रिकेटचे सामने खेळले नाही. तसंच श्रेयस अय्यरने पाठीच्या दुखापतीचं कारण सांगत मुंबईसाठी रणजी क्वार्टर फायनलचा सामना खेळला नाही. तामिळनाडू विरोधात झालेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात तो खेळला. तसंच रविवारी विदर्भाविरोधात झालेल्या सामन्यासाठीही तौ मैदानात उतरला होता. अशातच बोर्डाच्या निर्देशांना न मानणाऱ्या या दोन्ही खेळाडूंना बीसीसीआयच्या करारात स्थान मिळालं नाही.