टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचणारी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू मायदेशी परतली आहे. यावेळी दिल्ली विमानतळावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी तिने विजयामुळे तिथे खूप खुश असल्याचे सिंधूने मायदेशी परतल्यावर सांगितले.
विमानतळावर दाखल झाल्यानंतर बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस अजय सिंघानिया यांनी सिंधू आणि तिचे प्रशिक्षक पार्क ते-सांग यांचे स्वागत केले. "सामना जिंकल्यानंतर मी पाच ते दहा सेकंदांसाठी सर्व काही विसरले. त्यानंतर मी स्वत: ला धरले आणि उत्सव साजरा करताना ओरडले", अशी भावना सिंधूने पदक जिंकल्यानंतर व्यक्त केली होती.
टोक्योमध्ये सिंधूने चीनच्या बिंग जिआओचा पराभव करत कांस्यपदक पटकावले. सलग दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू आहे. यापूर्वी २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते.