बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळाशी संबंधित प्रकरण सध्या न्यायालयात प्रकरण सुरु असताना त्यावरच आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.अधिकाऱ्यांच्या कार्यकाळाशी संबंधित प्रकरणात न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे.
न्यायालयाने बुधवारी निकाल देताना बीसीसीआयच्या घटनेतील दुरुस्तीलाही मान्यता दिली आहे. न्यायालयाने बीसीसीआयच्या याचिकेवर सुनावणी करताना कूलिंग ऑफ पीरियडशी संबंधित घटनेतील दुरुस्तीला मान्यता दिली आहे. याचा अर्थ गांगुली आणि जय शाह यांच्या कार्यकाळावर आता कोणतेही संकट नाही. आता हे दोघेही सलग दोन टर्म आपापल्या पदावर राहणार आहेत.
काय आहे प्रकरण?
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचा बोर्डाचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे, मात्र या प्रकरणी बीसीसीआयने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दोघांच्या कार्यकाळातील कुलिंग ऑफ कालावधी वाढवावा, असे बोर्डाचे म्हणणे होते. नियमांमध्ये सुधारणा करण्याबाबत बोर्डाने दाखल केलेल्या याचिकेवर लवकरच सुनावणी घेण्यात यावी, असे आवाहन बीसीसीआयकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आले होते. या याचिकावर न्यालयाने सुनावणी देत दोघांही दिलासा दिला आहे.
कूलिंग ऑफ पीरियड?
बीसीसीआयने स्वीकारलेल्या घटनेनुसार, एखाद्या पदाधिकाऱ्याला राज्य असोसिएशन किंवा बीसीसीआय किंवा दोन्ही संयुक्तपणे सलग दोन टर्ममध्ये तीन वर्षांचा कूलिंग ऑफ कालावधी पार करावा लागतो.