क्रिकेटमध्ये आजवर अनेक अशा मैत्रीच्या जोड्या पाहायला मिळाल्या आहेत. मग ते दिग्गज खेळाडू कपिल देव, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर किंवा सौरव गांगुली हे यांच्यापासून ते आताचे खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बूमराह किंवा सूर्यकुमार यादव हे असो भारताने क्रिकेटमध्ये अशा मैत्रीच्या अनोख्या जोड्या पाहिल्या आहेत. ज्यामध्ये सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर, विराट कोहली आणि रोहित शर्मा तर आताचे खेळाडू शुभमन गिल आणि ईशान किशन या खेळाडूंच्या मैत्रीचे रुप काहीसे वेगळेच पाहायला मिळाले आहे.
तर यांच्यातील बहुतेक खेळाडूंनी क्रिकेटला रामराम केला आहे. यादरम्यान भारतीय संघातील एक उत्तम कामगिरी करणारा खेळाडू आपल्या निवृत्तीची घोषणा 15 ऑगस्टला करणार असल्याचं समोर आलं आहे. 15 ऑगस्ट हा दिवस भारतासाठी आणि भारतातील प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचा आणि खास आहे. कारण याच दिवशी भारत ब्रिटीश राजवटी विरुद्ध स्वतंत्र्य झाला होता. यासाठी अनेक भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता स्वत:ला फासावर चढवून आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे 15 ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येकासाठी देशभावना निर्माण करणारा आहे.
अशातच क्रिकेटमध्ये आपली अव्वल कामगिरी बजावनारा भारताचा एक उत्कृष्ट खेळाडू महेंद्रसिंह धोनी हा 15 ऑगस्टला क्रिकेटमधून आपल्या निवृत्ती घोषणा जाहीर करणार आहे. यादरम्यान धोनीने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे, ज्यात तो असं बोलला आहे,"तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल खूप खूप धन्यवाद 1929 तासांपासून मला सेवानिवृत्त समजा". धोनीची ही पोस्ट त्याच्या चाहत्यांसाठी अत्यंत भावनिक आहे. धोनीने क्रिकेटच्या क्षेत्रात आपल्या अनोख्या अंदाजाने आणि अव्वल कामगिरीने चाहत्यांच्या मनात आपली छाप सोडली आहे. त्याचा चाहतावर्ग ही मोठ्या संख्येने पाहायला मिळतो. त्यामुळे धोनीची निवृत्तीची घोषणा त्याच्या चाहत्यांना धक्कादायक ठरण्यासारखी आहे. अशातच मागोमाग सुरेश रैना यानेही आपण रिटायर होत असल्याचं जाहीर केलं आहे. रैनाने स्पष्ट केले आहे की, तो धोनीनंतर लगेच स्वत:च्या निवृत्तीचा निर्णय स्पष्ट करणार आहे.