क्रीडा

IPL 2024 Auction: आयपीएल लिलावापूर्वी 'या' 3 स्टार खेळाडूंनी नावं घेतली मागे

आयपीएल ऑक्शनचं पहिल्यांदाच भारताबाहेर आयोजन करण्यात आलं आहे. ऑक्शन दुबईतील कोको कोला अरेना येथे आयोजन करण्यात आलं आहे.

Published by : Team Lokshahi

IPL 2024 Auction Update: आयपीएल 2024 ऑक्शनला 19 डिसेंबर म्हणजेच आज भारतात दुपारी 1 वाजता सुरुवात होईल. तसेच स्थानिक वेळेनुसार दुबईत ऑक्शन सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. आयपीएल ऑक्शनचं पहिल्यांदाच भारताबाहेर आयोजन करण्यात आलं आहे. ऑक्शन दुबईतील कोको कोला अरेना येथे आयोजन करण्यात आलं आहे. ज्यामध्ये 215 अनकॅप्ड खेळाडूंसह एकूण 333 खेळाडूंवर बोली लावली जाईल. मात्र, या लिलावाच्या एक दिवस आधी मोठी बातमी समोर आली आहे.

इंग्लंड संघाचा स्टार लेगस्पिन अष्टपैलू खेळाडू रेहान अहमदने आयपीएल लिलावातून आपले नाव मागे घेतले आहे. त्यांच्याशिवाय बांगलादेश संघाचे स्टार वेगवान गोलंदाज तस्किन अहमद आणि शौरीफुल इस्लाम यांनीही आयपीएल लिलावातून आपली नावं मागे घेतली आहेत.

रेहानला पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर यायचं आहे. जानेवारीत इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर जर तो आयपीएल खेळला तर त्याला आणखी 2 महिने देशाबाहेर राहावं लागेल. पण रेहानने इतक्या लहान वयात इतकं दिवस घरापासून दूर राहावं, असं इंग्लंड बोर्डाला वाटत नाही. त्यामुळेच रेहाननं आपल नाव आयपीएलच्या लिलावातून मागे घेतल्याचं बोललं जात आहे.

बांगलादेशचे स्टार वेगवान गोलंदाज तस्किन अहमद आणि शौरीफुल इस्लाम यांनीही आयपीएल लिलावातून आपली नावं मागे घेतली आहेत. याचं कारण म्हणजे, बांगलादेशला मार्च आणि एप्रिलमध्ये घरच्या मैदानावर श्रीलंका आणि झिम्बाब्वेविरुद्ध मालिका खेळायची आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू आयपीएल खेळू शकणार नाहीत.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी