भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेल रत्न पुरस्कारासाठी भारताची दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राजसह फिरकीपटू आर. आश्विनच्या नावाची शिफारस केली आहे. यासोबत अर्जुन पुरस्कारासाठीच्या क्रिकेटपटूंची नावे बीसीसीआयने सूचवली आहेत. 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय खेल दिवसाचे औचित्य साधून या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
देशांसाठी क्रिडा क्षेत्रात उल्लेखणीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सम्मान करण्यासाठी खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारासारखे पुरस्कार दिले जातात. दरम्यान यंदाच्या वर्षी अप्रतिम कामगिरी केलेल्या खेळाडूंची नावे पुरस्कारासाठी सूचविली आहेत.
दरम्यान क्रिकेटसह हॉकी इंडियाकडून गोलकीपर पीआर श्रीजेशचे नाव खेल रत्न आणि हरमनप्रीत सिंह, वंदना कटारिया आणि नवज्योत कौर यांचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित केले आहे. तर भारतीय एथलेटिक्स फेडरेशनने ओडिशा सरकारकडून धावपटू दुती चंदचे नाव खेल रत्न पुरस्कारासाठी सूचवले आहे.