भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाचा फ्रिस्टाईल कुस्ती प्रकारात ५-१२ असा पराभव झाला आहे. बजरंगचा सामना तीन वेळचा विश्वविजेता आणि रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता अजरबैजानच्या हाजी अलीवशी झाला. या सामन्यात अझरबैजानच्या कुस्तीपटूने बजरंगला १२-५ ने पराभूत केले. याआधी कुस्तीपटू रवी दहियाने गुरुवारी भारतासाठी रौप्यपदक जिंकले.
बजरंग पुनिया पहिल्या फेरीत १-४ ने पिछाडीवर होता. त्याने दुसऱ्या फेरीत काही चांगले डावपेच खेळले. मात्र हाजी अलीवने या फेरीतही गुण घेत आपली आघाडी वाढवली. दोन मिनिटे असताना बजरंगने चॅलेंज घेतले, पण ते अयशस्वी ठरले. बजरंगने उपांत्यपूर्व फेरीत आपल्या अनुभवाचा आणि कौशल्याचा चांगला वापर करून ६५ किलो वजनी गटात इराणच्या मुर्तझा चेका घियासीवर विजय नोंदवला होता. आशियाई स्पर्धेत कांस्यपदक विजेता असलेल्या मोर्तेजा आणि बजरंगमध्ये कडवी झुंज बघायला मिळाली.