क्रीडा

Babar Azam: विराट कोहलीला मागे टाकून बाबर आझमने रचला इतिहास! T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा बनला फलंदाज

Published by : Dhanshree Shintre

T20 World Cup 2024च्या सध्याच्या स्पर्धेतील 11वा सामना गुरुवारी पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात झाला. या सामन्यात मोनांक पटेलच्या संघाने सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव केला. डॅलसमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 विकेट गमावत 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात अमेरिकेने 20 षटकांत 3 गडी गमावून 159 धावा केल्या. यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने 18 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचे फलंदाज केवळ 13 धावा करू शकले.

या रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मोठी कामगिरी केली आहे. त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत विराट कोहलीला मागे टाकले आहे. तो T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. या अनुभवी फलंदाजाच्या नावावर 113 डावात 4067 धावा आहेत. त्याचबरोबर टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने 110 डावात 4038 धावा केल्या आहेत. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात विराटला काही विशेष दाखवता आले नाही.

पाकिस्तानने 2024च्या T20 विश्वचषकातील पहिला सामना अमेरिकेविरुद्ध खेळला होता. या सामन्यात बाबर आझमने 44 धावा केल्या पण त्याचा स्ट्राइक रेट 102.32 इतका खूप खराब होता. अमेरिकेचा गोलंदाज जसदीप सिंगने 16व्या षटकाचा शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानच्या कर्णधाराला एलबीडब्ल्यू आऊट केले. 43 चेंडूंचा सामना करताना 29 वर्षीय फलंदाजाने 3 चौकार आणि 2 षटकार ठोकले. त्याची सुस्त फलंदाजी अशी होती की 19 चेंडूंचा सामना करुनही त्याची वैयक्तिक धावसंख्या केवळ 6 धावा होती.

भारताची वाढती लोकसंख्या अर्थव्यवस्थेसाठी आव्हान

Israel - Hamas Conflict : इस्रायल-हमास युद्धाला पूर्णविराम? हमासचा म्होरक्या याह्या सिनवार अखेर ठार

Chandrashekhar Bawankule : नांदेड लोकसभा पोटनिवडणूक भाजप लढणार का?; चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरळ सांगितले...

Bacchu Kadu : 4 नोव्हेंबरला पूर्ण चित्र स्पष्ट होईल, मोठा स्फोट होईल; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य

ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; आठ आरोपींना जामीन मंजूर