आज आयसीसी महिला टी 20 वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघात हा अंतिम सामना झाला. परंतु, नेहमीप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा दबदबा कायम राहिला आणि ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. या विजयासोबतच ऑस्ट्रेलियाच्या संघाने सहाव्यांदा वर्ल्डकप चषकावर आपले नाव कोरलं.
आजचा हा सामना दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर पार पडला. सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियन महिलांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने अनुभवी बेथ मूनी हिच्या नाबाद 74 धावांच्या जोरावर 157 धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले. दक्षिण आफ्रिकेकडून लॉरा वोल्वार्ड हिने 61 धावांनी एकहाती झुंज दिली. पण तिला इतर खेळाडूंची साथ न मिळाल्याने अखेर 137 धावाच दक्षिण आफ्रिकेचा संघ करु शकला. ज्यामुळे 19 धावांनी ऑस्ट्रेलियाने सामना आणि विश्वचषक जिंकला.