क्रीडा

Kieron Pollard: वयाच्या 37 व्या वर्षी पोलार्डने उडवली खळबळ; एका षटकात मारले चार षटकार

नाबाद अर्धशतकामुळे त्रिनबागो नाइट रायडर्सने सेंट लुसिया किंग्जवर चार विकेट्सने विजय मिळवला.

Published by : Dhanshree Shintre

वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने मंगळवारी कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) मध्ये दमदार कामगिरी केली आणि एका षटकात चार षटकार मारून संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या नाबाद अर्धशतकामुळे त्रिनबागो नाइट रायडर्सने सेंट लुसिया किंग्जवर चार विकेट्सने विजय मिळवला.

सेंट लुसिया येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पोलार्डने 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शेवटच्या 12 चेंडूत 27 धावांची गरज होती. त्यानंतर पोलार्डने जबाबदारी स्वीकारली आणि एका षटकात चार षटकार मारत संघाला विजयाच्या जवळ नेले. त्याने 19 चेंडूत झंझावाती अर्धशतक झळकावले.

पोलार्डने 19व्या षटकात एकूण चार षटकार ठोकले . त्याने अवघ्या 19 चेंडूत नाबाद 52 धावा करत संघाला विजयाच्या जवळ नेले. या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. अखेरच्या षटकात संघाला विजयासाठी तीन धावांची गरज होती. अकील हुसेनने (नाबाद 5) पहिल्या चेंडूवर चौकार मारून लक्ष्य गाठले. त्रिनबागोचा हा स्पर्धेतील दुसरा विजय होता, ज्यांचे आता तीन सामन्यांतून चार गुण आहेत आणि सहा संघांच्या लीडरबोर्डवर ते तिसरे स्थानावर आहेत.

जर आपण वेस्ट इंडिजच्या महान अष्टपैलू खेळाडूच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 123 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2706 धावा आणि 55 विकेट घेतल्या. त्याचवेळी त्याने 101 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1569 धावा आणि 42 विकेट घेतल्या. माजी कर्णधाराने 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने आयपीएलमधूनही निवृत्ती घेतली आहे. सध्या तो मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक आहे. आपल्या 13 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत त्याने 189 सामन्यांमध्ये 28.67 च्या सरासरीने आणि 147.32 च्या स्ट्राइक रेटने 3412 धावा केल्या. यामध्ये 16 अर्धशतकांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...