क्रीडा

Tokyo Paralympics | सोनेरी यश मिळवणाऱ्या अवनीवर बक्षिसांचा वर्षाव, आनंद महिंद्रा देणार खास गिफ्ट

Published by : Lokshahi News

टोकियोमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारतीय अॅथलिट आपली दर्जेदार कामगिरी दाखवत आहेत. सोमवारी सकाळी अवनी लेखरा हिने महिलांच्या दहा मीटर एअर रायफलच्या क्लास एसएच नेमबाजीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. (Tokyo Paralympics)अंतिम फेरीत तिने २४९.६ गुण मिळवत तिने जागतिक विक्रमाची बरोबरी करत अव्वलस्थान पटकावले. (Avani Lekhara) पात्रता फेरीत सातव्या स्थानावर राहिलेल्या अवनीने अंतिम फेरीत मात्र जोरदार कामगिरी केली आणि सुवर्णवेध घेतला. या स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे. दरम्यान, हे सुवर्णपदक जिंकल्यानंतर अवनीवर कौतुकाचा आणि बक्षिसांचा वर्षाव होऊ लागला आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीही अवनीच्या या कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला आहे. अवनीला स्पेशल गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. आम्ही दिव्यांगांसाठी एसयूव्ही विकसित करावी, असा सल्ला काही दिवसांपूर्वी दीपा मलिक हिने दिला होता. मी माझे सहकारी वेलू यांना या आव्हानाचा सामना करण्यासाठी विनंती केली आहे. वेलू हे आमचे डेव्हलपमेंट हेड आहेत. असो वेलूजी तुमच्याकडून विकसित झालेली अशी पहिली एसयूव्ही #AvaniLekhara हिला समर्पित करून भेट देऊ इच्छितो. अशी माहिती आनंद महिंन्दा यांनी ट्विट करत दिली.

ऑलिम्पिक असो वा पॅरालिम्पिक या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी अवनी ही भारताची पहिली महिला खेळाडू आहे. तत्पूर्वी पी.व्ही. सिंधू आणि मीराबाई चानू यांनी ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या गटात रौप्यपदके जिंकली होती.

मुंबईत तापमानात घट, उपनगरांत पारा 20 अंशाखाली

भाज्यांची किंमतवाढ ६३.०४ टक्क्यांवर; घाऊक महागाईचाही चार महिन्यांतील सर्वोच्च स्तर

Special Report | Vadgaon Sheri Vidhan Sabha Election | ऐन निवडणूकीत सुनील टिंगरेंना मोठा धक्का

NEWS PLANET With Vishal Patil | PM Modi | मोदींचं 'मिशन ग्लोबल साऊथ' ; असा असेल दौरा

Aditya Thackeray यांचा कदम पिता-पुत्रांवर निशाणा ; Ramdas Kadam यांचं जोरदार प्रत्युत्तर