Ajinkya Rahane Team Lokshahi
क्रीडा

अजिंक्य रहाणेची आयपीएल मधून माघार, कारण

KKRच्या उर्वरित लीग सामन्यांमध्ये खेळणार नाही

Published by : Saurabh Gondhali

कोलकाता नाईट रायडर्सचा( Kolakata Knight Riders) संघ IPL 2022 मध्ये प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी झगडत आहे. याच दरम्यान त्यांना एक मोठा धक्का बसला असून त्यांचा अनुभवी सलामीवीर फलंदाज अजिंक्य रहाणे( Ajinkya Rahane) दुखापतग्रस्त झाला आहे. अजिंक्य रहाणेला हॅमस्ट्रिंगची (स्नायूंची) दुखापत झाली असल्याने त्याने उर्वरित IPL मधून माघार घेतली. याचाच अर्थ आता KKRच्या उर्वरित लीग सामन्यांमध्ये तो खेळू शकणार नाही. KKR ने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण १३ सामन्यांपैकी ६ विजय मिळवले आहेत. तर ७ सामने गमावले आहेत. त्यामुळे १२ गुणांसह त्यांचा संघ सहाव्या स्थानावर आहे.

IPL 2022 संपल्यानंतर, भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंडला जाईल. तिथे टीम इंडिया एक कसोटी आणि त्यासोबतच वन डे आणि टी२० मालिका खेळणार आहे. परंतु, नुकत्याच झालेल्या दुखापतीमुळे अजिंक्य रहाणे इंग्लंड दौऱ्यासाठी उपलब्ध होणार नसल्याचे मानले जात आहे. IPL पूर्वी श्रीलंकेविरुद्ध मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेसाठी रहाणेची भारतीय संघात निवड झाली नव्हती. तशातच आता या दुखपातीमुळे त्याला आगामी कसोटी मालिका संधी मिळणार की नाही, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का