Hardik Pandya team lokshahi
क्रीडा

आकाश चोप्राने हार्दिक पांड्याची 'कॅप्टन ऑफ द सीझन' म्हणून केली निवड, कारणही सांगितलं

तर गुजरातला सहाव्या गोलंदाजाचा पर्याय उपलब्ध झाला नसता

Published by : Shubham Tate

माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने (Aakash Chopra) गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या (hardik pandya) याचे काैतुक केले आहे. आयपीएल 2022 चा सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून त्याचा गाैरव केला आहे. त्याने म्हटले आहे की, हार्दिकने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करत संघाचे नेतृत्व केले. हार्दिकच्या कर्णधारपदात कोणतीही कमतरता नसल्याचेही तो म्हणाला. (aakash chopra choose hardik pandya as captain of season ipl 2022)

आकाश चोप्रा त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, 'हार्दिक पांड्याने खूप चांगले काम केले आहे. अविश्वसनीय काम केले आहे. हार्दिक पांड्याने धावा केल्या नसत्या तर हा संघ कुठेही पोहोचला नसता. त्याने गोलंदाजी केली नसती तर गुजरातला सहाव्या गोलंदाजाचा पर्याय उपलब्ध झाला नसता. इथेही त्याने गोलंदाजी करताना विकेट्स घेतल्या आणि त्यानंतर त्याच्या कर्णधारपदात कोणतीही कमतरता राहिली नाही. त्याने उत्तम कर्णधारपदी काम केले. माझ्यासाठी तो 'कॅप्टन ऑफ द सीझन' आहे.

अंदाज चुकीचा सिद्ध करून चॅम्पियन बनला

IPL 2022 च्या मेगा लिलावापूर्वी, गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) त्यांच्या ड्राफ्टमध्ये कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याचा समावेश केला होता. गुजरातच्या या निर्णयामुळे क्रिकेट तज्ज्ञ आश्चर्यचकित झाले आहेत. अनेक माजी क्रिकेटपटू हार्दिकच्या गोलंदाजीच्या तंदुरुस्तीवर आणि कर्णधारपदावर शंका घेत होते. याचे कारण असे की हार्दिक दीर्घकाळ गोलंदाजी करत नव्हता आणि त्याने वरिष्ठ स्तरावर फक्त एकदाच कर्णधारपद भूषवले होते. पण पांड्याने या आयपीएल हंगामात या सर्व शंकांना बगल देत गुजरातला आयपीएल 2022 चा चॅम्पियन बनवले.

हार्दिक पांड्यासाठी हा मोसम खूप चांगला आहे

या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 खेळाडूंमध्ये हार्दिकचा समावेश होता. त्याने 44.27 च्या सरासरीने 487 धावा केल्या. यादरम्यान हार्दिकचा स्ट्राईक रेटही131.26 होता. या मोसमात त्याने एकूण 4 अर्धशतके झळकावली. यासोबतच तो गोलंदाजीतही उत्कृष्ट होता. त्याने प्रति षटकात फक्त 7.27 धावा दिल्या आणि 8 विकेट घेतल्या. आयपीएल 2022 च्या अंतिम सामन्यातही तो 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरला होता.

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड