क्रीडा

IPL 2024: टीम इंडियाला मोठा धक्का! भारताचा वेगवान गोलंदाज आयपीएल २०२४ मधून बाहेर

Mohammed Shami: आगामी २०२४ आयपीएलपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. आयपीएल २०२४, 22 मार्चपासून सुरू होत आहे.

Published by : Dhanshree Shintre

आगामी २०२४ आयपीएलपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. आयपीएल २०२४, 22 मार्चपासून सुरू होत आहे. यापूर्वी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऋषभ पंत, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा यांचे वैद्यकीय आणि फिटनेस अपडेट जारी केले आहेत. या मोठ्या स्पर्धेपुर्वी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहमद शमी स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आयपीएल २०२४ मधून बाहेर पडल्याची पुष्टी बीसीसीआयने केली आहे. बीसीसीआयने जारी केलेल्या मेडिकल अपडेटमध्ये ऋषभ पंत आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सांगण्यात आले. तर मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा आयपीएल २०२४ मध्ये खेळू शकणार नाहीत. मोहम्मद शमीच्या उजव्या टाचेत समस्या येत होती, त्यामुळे २६ फेब्रुवारी २०२४ रोजी त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे, शमीही आयपीएल २०२४ मधून बाहेर आहे.

शमी भारताकडून अखेरचा एकदिवसीय विश्वचषक फायनल नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. शमीने विश्वचषक स्पर्धेतील 7 सामन्यात 24 विकेट घेत भारतासाठी चमकदार कामगिरी केली, वेदना असूनही तो या स्पर्धेत खेळला. गोलंदाजी करताना त्याला लँडिंगमध्ये अडचणी येत होत्या. पण त्याचा त्याच्या कामगिरीवर परिणाम होऊ दिला नाही. नुकताच शमीला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शमीने आपल्या एका दशकाहून अधिक काळातील कारकिर्दीत 229 कसोटी, 195 एकदिवसीय आणि 24 टी-20 विकेट्स घेतल्या आहेत.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका