भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारताने 8 गडी गमावून 185 धावांचा डोंगर रचला आहे. सूर्यकुमार यादवच्या 57 आणि श्रेयस अय्यरच्या 36 धावांच्या खेळीमुळे भारताने हि धावसंख्या उभारली आहे. जोफ्रा आर्चेरने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.त्यामुळे आता इंग्लंडसमोर 186 धावांचे आव्हान असणार आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.यावेळी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताची सुरुवात काहीशी चांगली झाली नाही. रोहित शर्मा 12 धावावर बाद झाला. त्यामुळे रोहितच्या रुपात भारताला पहिला धाक बसला. त्यानंतर के.एल.राहुल पुन्हा एकदा निराशा केली. 14 धावावर तो बाद झाला. विराट कोहली सुद्धा 1 धाव काढून माघारी गेला. त्यांनंतर उतरलेल्या सूर्यकुमार यादवने डाव साभाळत 57 धावा केल्या. ॠिषभ पंत 30 धावावर बाद झाला. श्रेयस अय्यरने सुद्धा 37 धावा कुटल्या. हार्दिक पांड्याने 11, वॉशिंग्टन सुंदर 4 वर बाद झाला. तर शार्दुल ठाकूरने नाबाद 10 धावा केल्या. या जोरावर भारताने 8 गडी गमावून 85 धावा केल्या होत्या.
आता इंग्लंडसमोर 180 धावांचे आव्हान असणार आहे. इंग्लंडने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे, त्यामुळे इंग्लंड हे आव्हान पूर्ण करून मालिका खिशात घालते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.