सनरायजर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करत 3 विकेट गमावून 171 धावांपर्यत मजल मारली आहे. डेविड वॉर्नर आणि मनीष पांडेच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर हैदराबादने ही धावसंख्या गाठली. चेन्नई सुपर किंग्ज समोर 140 धावांचे आव्हान असणार आहे.
या सामन्याचे नाणेफेक जिंकून सनरायजर्स हैदराबादने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. हैदराबादची सुरुवात चांगली झाली. डेविड वॉर्नर 57, जॉनी बेयरस्टो 7, मनीष पांडे 61, केन विल्यमसन 26 धावा केल्या. या धावांच्या बळावर 3 विकेट गमावून 171 धावांपर्यत मजल मारली. आता चेन्नई सुपर किंग्जला जिंकण्यासाठी 172 धावांचे आव्हान पूर्ण करावे लागणार आहे.