IPL T20 2021

IPL 2022: 15 व्या हंगामात नवं काय जाणून घ्या…

Published by : Vikrant Shinde

IPL 2022 : भारत हा देश क्रीकेटप्रेमींचा देश म्हणुनही ओळखला जातो. त्यात IPL चा हंगाम म्हणजे, क्रीकेटप्रेमींसाठी अगदी पर्वणीच असते. त्यातल्या त्यात यंदाचा (2022) IPL हंगाम (IPL 2022 Season) म्हणजे तर क्रीकेटप्रेमींसाठी दुग्धशर्करा योगच आहे. कारण ह्यावेळी IPL मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. त्या बदलांपैकी महत्त्वाचा बदल म्हणजे, यंदा आयपीएलमध्ये दोन नव्या संघाची भर पडली आहे.

IPL 2022 मध्ये नवं काय?

  • यंदाच्या आयपीएलमध्ये आठऐवजी दहा संघ असणार आहेत
  • दहा संघांची दोन व्हर्च्युअल गटात विभागणी करण्यात आली आहे.
  • मुंबई (MI), कोलकाता (KKR), राजस्थान (RR), दिल्ली (DC) आणि लखनौ (lucknow SuperGiants) हे संघ एका गटात असणार आहेत.
  • तर, चेन्नई (CSK) , हैदराबाद (SRH) , बंगलोर (RCB) , पंजाब (KXIP) आणि गुजरातच्या (Gujrat Titans) संघांचा दुसऱ्या गटात समावेश आहे.
  • यातील प्रत्येक संघ आपल्या गटातील चारही संघांशी आणि समोरच्या गटातील एका संघाशी प्रत्येकी दोन सामने खेळेल.
  • तर दुसऱ्या गटातील इतर चार संघांशी एक सामना खेळेल.
  • त्यामुळे प्रत्येक संघ आधीप्रमाणेच 14 च साखळी सामने खेळेल.

आयपीएलच्या नव्या मोसमाआधी मेगा लिलाव (IPL Mega Auction 2022) पार पडला होता. जवळपास सगळ्या फ्रँचायझींनी आपल्या संघात मोठे बदल केलेले पाहायला मिळाले आहेत. गेली अनेक वर्षे मुंबई इंडियन्सचा भाग असलेला हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यंदा नव्यानं दाखल झालेल्या गुजरात संघाचा कर्णधारपदी विराजमान झाला आहे. तर लोकेश राहुलनं नवख्या लखनौ संघाची कमान सांभाळलीय. महत्वाची बाब ही की दिल्लीतून निघून कोलकात्याच्या संघात सामील झालेला मुंबईचा श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) कोलकात्याचा कर्णधारही बनला. विराट कोहली (Virat Kohli) आणि धोनी (M S Dhoni) मात्र यंदाच्या हंगामात खेळाडू म्हणून खेळणार आहेत. धोनीने चेन्नईचं कर्णधारपद सोडलंय, तर विराट कोहली आरसीबीच्या कर्णधारपदावरुन पायउतार झालाय. त्यामुळे संघ बदलले आहेत. खेळाडू बदलले आहेत. इतकेच नाही तर मैदानंही बदलली आहेत एकंदरीतच IPLचं जवळ-जवळ संपूर्ण स्वरूपच बदललं आहे.

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

IPL Mega Auction 2025 Live: राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू देवदत्त पडिक्कल अन्सोल्डवर!

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव