Konkan

Watch Video;वय फक्त 6 वर्ष; नववारी साडीत रॉक क्लाइंबिंग करत सर केला गड

Published by : left


सुरेश काटे | सह्याद्री पर्वत रांगांतील नवरा नवरी सुळख्यांचे (Navra Navri Sulka) गिर्यारोहकांना नेहमीच आकर्षण राहिले आहे. या नवरा नवरी सुळख्यांची (Navra Navri Sulka) भुरळ एका सहा वर्षीय चिमुरडीला पडली, आणि तिने नववारी साडी नेसून झिप्लायनिंग करत गड सर केला आहे. कल्याणच्या सह्याद्री रॉक एॅडव्हेंचर या साहसी गिर्यारोहक संस्थेच्या मदतीने ही कामगिरी केली आहे. तिने दाखविलेल्या या धाडसामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कल्याणच्या ग्रीहिता विचारे (Grihita Vichare) (वय 6) मुलीने भारतीय पारंपरिक वेशातील नऊवारी साडी नेसली होती. नवरी सुळका २८० फूट उंच, नवरा सुळका (Navra Navri Sulka) २६० फूट उंच आहे. ग्रीहिता हिने (Grihita Vichare) लक्ष्मणपाडा इथून सोमवारी सकाळी सहा वाजता सुळक्यावर (Navra Navri Sulka) चढण्यास सुरुवात केली. एक तासात तिने ही मोहीम फत्ते केली. "सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर" ह्या गिर्यारोहण क्षेत्रातील नावाजलेल्या संघाने ग्रीहिता हिला प्रस्तरारोहणचे साहित्य योग्य रितीने लावून तिला चढाई साठी तयार केले.त्यात कंबरेला बांधलेले हर्णेस,डोक्यावर हेल्मेट,झूमर असे विविध साहित्य तपासले. अथक प्रयत्न केल्यानंतर नवरी सूळख्या वर ग्रीहिता पोहचली, जिथे सहयाद्री रॉक ऍडव्हेंचर ह्यांनी १ दिवस आधीच झिप्लायनिंगचा सेटअप लावला होता.ग्रीहिताने झिप्लायनिंगद्वारे यशस्वी चढाई करून सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर संघाच्या मदतीने कल्याण शहराच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला आहे.

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव