मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत पात्र लोकांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्यात येत आहे. सध्या 18 वर्षाच्या पुढील प्रत्येकाला लस मिळत आहे. तर आता तीन महिन्याच्या पुढील मुलांनाही कोरोनावरील लस मिळणार असल्याची माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी दिली आहे.
लवकरच तीन वर्षांवरील सर्व मुलांसाठी कोरोनावरील 'कोव्होव्हॅक्स' ही लस येणार आहे, अशी माहिती अदर पूनावाला यांनी दिली आहे.ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या सीआयआय पार्टनरशिप समिटमध्ये बोलताना अदर पूनावाला यांनी ही माहिती दिली आहे.दरम्यान, कोरोनाच्या आजाराशी संपूर्ण देश दोन हात करत असताना आता लहान मुलांनाही कोरोनावरील लस उपलब्ध होणार आहे.