Ganesh Utsav 2021

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट; भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना स्वरवंदना देणारा कार्यक्रम

Published by : Lokshahi News

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सव उत्साहात सूरू आहे. या उत्सवाला गणेशभक्तांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आज या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवात 'स्वरभास्कर' हा भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना स्वरवंदना देणारा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त सर्वच गणेशभक्तांना सांस्कृतिक मेजवानीचा नजराणा रात्री ८ वाजता लोकशाही न्यूज Lokshahi News आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या http://www.bhaurangari.com संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

आज या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवात 'स्वरभास्कर' हा भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना स्वरवंदना देणारा कार्यक्रम होणार आहे. पं. आनंद भाटे, पं. जयतीर्थ मेवुंडी, पं. रघुनंदन पणशीकर व पं. शौनक अभिषेकी या कार्यक्रमात सादरीकरण करणार आहे.यानिमित्त सर्वच गणेशभक्तांना सांस्कृतिक मेजवानीचा नजराणा रात्री ८ वाजता लोकशाही न्यूज Lokshahi News आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या http://www.bhaurangari.com www.bhaurangari.com संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचे उत्सवप्रमुख पुनीत बालन आहेत. यंदा या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचे दुसरे वर्ष आहे. हा महोत्सव 10 ते 19 सप्टेंबर दरम्यान असाच सूरू राहणार आहे. 'स्वरभास्कर' हा भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना स्वरवंदना देणारा पं. आनंद भाटे, पं. जयतीर्थ मेवुंडी, पं. रघुनंदन पणशीकर व पं. शौनक अभिषेकी यांचा कार्यक्रम, ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया यांना समर्पित स्वरवंदना देण्यासाठी राकेश चौरासिया, अमर ओक, निलेश देशपांडे आणि वरद कठापूरकर यांचा 'हरि–प्रसाद', हृषिकेश रानडे, प्रियांका बर्वे, विश्वजित बोरवणकर, आनंदी जोशी यांचा कार्यक्रम लोकशाही न्यूजवर Lokshahi News आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या www.bhaurangari.com संकेतस्थळावर रात्री ८ वाजता पाहता येणार आहे. त्यामुळे या ऑनलाइन महोत्सवाचा गणेशभक्तांनी मनसोक्त आनंद घ्यावा, असे आवाहन लोकशाही न्यूज यानिमित्त करत आहे.

Latest Marathi News Updates live: संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू

मुंबईत 36 पैकी 16 जागा जिंकत भाजपची जोरदार मुसंडी

मध्य रेल्वे मार्गावर तीन दिवस विशेष वाहतूक ब्लॉक

हेल्दी आणि टेस्टी मुगाच्या लाडूची रेसिपी; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू; विविध विधेयकांवर होणार निर्णय